Ad will apear here
Next
बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे


पुणे :  बांधकाम साइटवर काम करणाऱ्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगारांसाठी मोफत ४५ आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रेडाई पुणे मेट्रो, पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत असून, नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा. लि.च्या औंध येथील लेबर कॅंपमध्ये पहिले आरोग्य तपासणी शिबिर घेऊन या उपक्रमाची सुरवात करण्यात आली.  

‘नाईकनवरे डेव्हलपर्स’चे संचालक आनंद नाईकनवरे, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. दिवाकर अभ्यंकर, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीच्या सदस्या आणि क्रेडाई पुणे मेट्रो महिला शाखेच्या निमंत्रक अर्चना बडेरा, सपना राठी, कामगार कल्याण समितीचे सदस्य पराग पाटील, समन्वयक समीर पारखी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी व राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाच्या सहसचिव डॉ. केतकी घाटगे, लसीकरण अधिकारी डॉ. अमित शाह, महापालिकेचे समन्वयक अधिकारी विनोद जाधव, ‘नाईकनवरे डेव्हलपर्स’च्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख विकास जाधव यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.  

या पहिल्या आरोग्य तपासणी शिबिरात १८० बांधकाम कामगारांची तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीबरोबरच कामगारांना धनुर्वाताचे इंजेक्शन आणि बालकांना पोलिओ लस देण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत पुढील ४४ आरोग्य शिबिरे येत्या सहा महिन्यात पालिकेच्या कार्यक्षेत्रातील बांधकामांच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत कामगारांची आरोग्य तपासणी, त्यांच्या मुलांना लसीकरण, राष्ट्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण, बालकांची जन्म नोंदणी आदींचा समावेश असणार आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना कल्पना बळीवंत म्हणाल्या, ‘कामगारांना विविध बांधकामांच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या लसीकरणाचा डोस पूर्ण होत नाही, परिणामी भविष्यात त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी ही शिबिरे उपयुक्त ठरतील.’

‘पहिल्या शिबिरामध्ये स्त्रीरोगतज्ञ, फिजिशियन, डॉक्टर्स, परिचारिका अशा एकूण १५ लोकांच्या चमुने सहभाग घेतला. सोबत लसीकरण वाहनाचीही सोय केली होती. पावसाळ्यात बळावणाऱ्या रोगराईची शक्यता लक्षात घेतल्यास आरोग्याबाबत कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा योग्य काळ आहे’, अशी माहिती डॉ. घाटगे यांनी दिली.

डॉ. अभ्यंकर म्हणाले, ‘शहरातील बांधकाम क्षेत्र आणि कामगारांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम खूप उपयुक्त ठरेल. याशिवाय या शिबिरादरम्यान कामगारांना एखादा आजार असल्याचे निदान झाल्यास त्यांना नजिकच्या महापालिका रुग्णालयात पुढील उपचार मिळतील, अशीही सोय करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण, जनजागृती कार्यक्रम, कामगारांच्या मुलांचे शिक्षण आदीसाठी कामगार कल्याण समितीतर्फे क्रेडाई पुणे मेट्रोच्या सदस्यांच्या मदतीने ‘सीएसआर’अंतर्गत उपक्रम घेण्यात येणार आहेत.’

आनंद नाईकनवरे म्हणाले, ‘देशाच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा विविध पातळ्यांवर विकास होण्याची गरज आहे. त्यातील आरोग्य विकासाचे पाऊल आज टाकले आहे. कामगारांचे वारंवार स्थलांतर, कायदेशीर बाबी, मुलांचे शिक्षण, कामाच्या ठिकाणांवरील सुरक्षितता आदी प्रश्न सोडविण्यासाठी असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी आमचे योगदान राहील.’

‘कामगार कल्याण समितीतर्फे कामगारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, शासनाकडून मिळणाऱ्या फायद्याचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्यासाठी कौशल्य विकास, सेफ्टी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते’, अशी माहिती अर्चना बडेरा यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZNHBO
Similar Posts
पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी ‘व्होडाफोन इको-पाँड्स’ पुणे : श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यास नागरिकांना साह्य करण्यासाठी आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाने ‘व्होडाफोन इको-पाँड्स’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी व्होडाफोनच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाने पुणे महापालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) यांच्याशी
पुणे शहरात स्वच्छ भारत अभियान पुणे : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पुणे रिजनल आउटरीच ब्युरो, केंद्रीय आवास व शहरी विकास मंत्रालय आणि पुणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पुणे शहरातील हडपसर, सिंहगड रोड आणि भवानी पेठ या तीन ठिकाणी १८, २० आणि २२ डिसेंबर २०१८ या दिवशी स्वच्छ भारत अभियान या विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ पुणे : ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ या सौंदर्य स्पर्धेचा दुसरा सिजन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. उंची, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गुण या निकषांवर मंजूषा मुळीक यांनी ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ चा किताब पटकावला.
शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा पुणे : शहरातील रेल्वे लाईन्सनजीक राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेऊन खासदार  अनिल शिरोळे यांनी ३० डिसेंबरला महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्यासोबत एक बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. ‘एसआरए योजना राबवून या नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language